Thursday 30 August 2007

अंधार..... कि प्रकाश

संध्याकाळ्ची वेळ, कामावरुन घरी चाललो होतो. संध्याकाळ असुनही सुर्याचा प्रकाश अगदी प्रखर आणि स्वच्छ होता. चालता चालता सतत सुर्याकडे बघत होतो. एकदम प्रकाश प्रखर झाला आणि डोळ्यासमोर लख्ख प्रकाश होता... पुढुन चालत येणारया व्यक्तिंच्या फ़क्त आक्रुत्या दिसत होत्या... उंच, ठेंगण्या, जाड, बारीक....

मनात आले कि डोळ्यासमोर अंधेरी आली का? किंबहुना खरा प्रकाशचं होता तो. ज्यामधे हे वास्तव कळत होते कि समोर दिसणारे सारे काही नुसतेच चेहरे आहेत, सगळे सारखे. ज्यामागे आपण इतके धावतोय तो अंधार, डोळ्यापुढे जे आत्ता दिसते आहे ते वास्तव...

Tuesday 19 June 2007

मुक्तछंद

पुन्हा एक पान, पुन्हा काहि शब्द, एकत्र येउन बनलेली वाक्य... निरर्थक वाक्य, चंचल वाक्य, सुसुत्र वाक्य, अर्थ मात्र एकच - कल्लोळ. ना व्रुत्त, ना अलंकार, ना लय, ना ताल.... मुक्तछंद. ना दिशा, ना ध्येय, ना उत्साह, ना सुत्र... मुक्तछंद. ना प्रेम, ना द्वेष, ना स्पर्धा, ना आकांक्षा.... मुक्तछंद.
कुठवर, कशासाठी, कुणासाठी, कां? कुठे विसावा नाहीचं का? कुठे वळण नाहीच का? कुठे दिशा नाहीच का?
वेड म्हणजे काय? एक विसावा... सतत असंबद्धपणे फ़िरणारया पात्रांचा एक सुसुत्र खेळ. एक म्रुगजळ, जे नाही त्यासाठीचा कधीही न संपणारा पाठलाग. एक वावटळ, दहाही दिशांनी येणारया जाणारया प्रकाशासोबत स्पर्धा करतांना होणारी तडफड. एक शुन्य, ज्याला सुरवात नाही, शेवट नाही, ज्याची खोली नाही, जाडी नाही... वेड.. एक भावनासंचय...

Tuesday 1 May 2007

Abrupt thoughts...

Life is so beautifully complicated that sometime you love it as “silk worm’s creativity” and sometime you just get lost in understanding its complexity…. (marathi madhe- tya guntyat guntun jata)

When you plan something, be assured that there will be change...

We always know the answers to our questions but we are so used to finding the solution from others we just stop thinking. Answer of your every question lies in the question itself!!!

Tuesday 9 January 2007

भास्कर!

तू रोज आपल्या सहस्त्ररश्मींनी
या विश्वातला अंधार दुर करतो
नव्या अपेक्षांची, आकांक्षांची
पुलकीत पहाट आपल्या कुशीत आणतो
कुठल्याही स्वार्थाशिवाय, अभिनिवेषाशिवाय...
तोच भास्कर संध्याकाळी थकून भागून
सागराच्या उदरात विसाव्यासाठी जातो
पण खरचं तो विसावा घेतो?
नाही खचितचं नाही
तो सारी शक्ती पुन्हा एकवटत असतो
नव्या पहाटेला, आकांक्षांना बळ देण्याकरता
कुठल्याही 'अहंगंडा'शिवाय
दुसरयांकरता आनंदाने, निरपेक्षपणे तो जगतो...
आणि तेवढ्याच तत्परतेने, मेघ दाटले कि
इतरांच्या चुकांची झालरही तो आपल्या अंगावर घेतो
ग्रहणाच्या वेळीही याचा स्वभावधर्म बदलत नाही
पूर्ण झाकोळून जायच्या आधी हिरयासारखा चमकल्याशिवाय राहत नाही..
कारण तो ही जाणत असतो, हे ग्रहण क्षणिक आहे
पून्हा त्याला आसमंत दिपवून टाकायचाय
क्षणापूर्वी पसरलेल्या भयंकर काळोखाचा लवलेषही न बाळगता.....

पायथ्याशी शिखर

शिखरावर गेल्यावर कळतं
पायथ्याशी काय सुख असतं
आकाश जरी जवळ भासलं
तरी क्षितिज मात्र दुर असतं

सुर्यही जातो संध्याकाळी
क्षितिजाच्या उदरात विसाव्यासाठी
आपण तरी साधी माणस आहोत
जगतोच मुळी निवारयाच्या शोधासाठी

शिखरावर पोचलं कि पून्हा
परतायचं पायथ्यापाशीच असतं
पायथ्याशी असतांना, कमीत कमी
मनात 'शिखराच' स्वप्न तरी वसतं

प्रश्न असतो तो फक्त
शिखर आणि पायथ्यातल्या अंतरातला
कुणासाठी आनंद वर जाणारया चढावातला
तर कुणासाठी धक्का क्षणार्धात खाली पोचवणारया उतारातला......

Saturday 6 January 2007

व्याख्या संगणक अभियंत्याची....

हम्मम्मम्म.... आता हा प्राणि कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे की जी व्यक्ति सतत आपण कुणीतरी वेगळे आहोत असे भासवत असते तरिही गल्लोगल्ली गठ्ठ्याने हे आढळतात, ज्यांच्याकडे पैश्याची कमतरता नसते परंतु तो पैसा, वापरायला मात्र वेळ नसतो, जे चारचौघात मिसळण्यापेक्षा ओर्कुट, माय स्पेस इत्यादि ठिकणी आपला वेळ सत्कारणी (?) लावतात, ज्यातल्या अनेक जणांचा एकदा तरी प्रेमभंग किंव्हा ब्रेकअप (:D :P) झालेला असतो...... आणि असंख्य उदाहरणे... हो एक राहिले.. जे हे असे ब्ला‍ग लिहत असतात..... (:P :P :P)

हलकेच घ्या,
आपलाच एक संगणक अभियंता (?) मित्र :-)

Friday 5 January 2007

ते म्हणाले....

चाणाक्य - संबंधोमे भावना होनि चाहिये, विवशता नहीं...

Take care of Pennies and Pounds shall take care of themselves...

Thursday 4 January 2007

कर्तव्य आणि भावना

कर्तव्य आणि भावना
यांना प्राधान्य देण्यात गफ़लत झाली
कर्तव्यामधली त्यागाची भावना
नकळतपणे बाजुला राहिली

कर्तव्य जाणत होतं
भावना अविचार करतेय
पण कर्तव्यचं ते
भावनेसाठी सारं सहन करतयं

शेवटी भावनेलाही कळलं
आपली वाट चुकली होती
पण करते काय बिचारी
कर्तव्याला कायमची मुकली होती...

चारोळ्या

तुटकं स्वप्न

फार कठिण असतं
आपलं स्वप्न तुटताना बघणं,
पण त्याहुन क्लेषदायक असतं
त्या तुटक्या स्वप्नासोबत जगणं

ती

आहे ती खुप खुप गोड
सोबतचं आहे तिला शालिनतेची जोड
म्हणुन म्हणतो मित्रा
नाही कुणी तिच्या तोडीस तोड

॥ श्रीगणेशायनम: ॥

Yahoo jhale, google jhale agdi orkuthi jhale... mag ya Blog ne tari kay ghode marale mhana. Mhantle chala ethehi thodi musafirri karawi.... mhanun hi surwat. majhya anudinichya nawacha blog majhya jawalchya mitrane already dhaplyamule mala nawin naw shodhawe lagale...
Aso... kahitari "bar" lihinyacha praytn karin...

Dhanyawad,
Amogh