Tuesday, 19 June, 2007

मुक्तछंद

पुन्हा एक पान, पुन्हा काहि शब्द, एकत्र येउन बनलेली वाक्य... निरर्थक वाक्य, चंचल वाक्य, सुसुत्र वाक्य, अर्थ मात्र एकच - कल्लोळ. ना व्रुत्त, ना अलंकार, ना लय, ना ताल.... मुक्तछंद. ना दिशा, ना ध्येय, ना उत्साह, ना सुत्र... मुक्तछंद. ना प्रेम, ना द्वेष, ना स्पर्धा, ना आकांक्षा.... मुक्तछंद.
कुठवर, कशासाठी, कुणासाठी, कां? कुठे विसावा नाहीचं का? कुठे वळण नाहीच का? कुठे दिशा नाहीच का?
वेड म्हणजे काय? एक विसावा... सतत असंबद्धपणे फ़िरणारया पात्रांचा एक सुसुत्र खेळ. एक म्रुगजळ, जे नाही त्यासाठीचा कधीही न संपणारा पाठलाग. एक वावटळ, दहाही दिशांनी येणारया जाणारया प्रकाशासोबत स्पर्धा करतांना होणारी तडफड. एक शुन्य, ज्याला सुरवात नाही, शेवट नाही, ज्याची खोली नाही, जाडी नाही... वेड.. एक भावनासंचय...

1 comment:

Leena said...

एक म्रुगजळ, जे नाही त्यासाठीचा कधीही न संपणारा पाठलाग. :)