Tuesday, 9 January 2007

पायथ्याशी शिखर

शिखरावर गेल्यावर कळतं
पायथ्याशी काय सुख असतं
आकाश जरी जवळ भासलं
तरी क्षितिज मात्र दुर असतं

सुर्यही जातो संध्याकाळी
क्षितिजाच्या उदरात विसाव्यासाठी
आपण तरी साधी माणस आहोत
जगतोच मुळी निवारयाच्या शोधासाठी

शिखरावर पोचलं कि पून्हा
परतायचं पायथ्यापाशीच असतं
पायथ्याशी असतांना, कमीत कमी
मनात 'शिखराच' स्वप्न तरी वसतं

प्रश्न असतो तो फक्त
शिखर आणि पायथ्यातल्या अंतरातला
कुणासाठी आनंद वर जाणारया चढावातला
तर कुणासाठी धक्का क्षणार्धात खाली पोचवणारया उतारातला......