ते वादळ आलं ती बहुदा मुळे आणखिन घट्ट करायला
तुमच्य़ा आत्म्याला हलवुन दाखवुन द्यायला तुमची शक्ति
आणि मग त्या थ्योड्या मोकळ्या झालेल्या मातीमधे परत घट्ट रुजवायची मुळे झाडाने
उगाचच वादळाला दोष दिला तेंव्हा
त्याने तर मदतच केली होती आपल्याला, अधिक द्रुढ बनायला
सारं आकाश, जमीन आणि अंत:करण यातल्या कचरयाचा निचरा करायला
मग तोच उडालेला कचरा गोल गोल फ़िरून दमला आणि शांतपणे दूर जाउन बसला
आता सारं काहि स्वच्छ झालय… परत एकदा वळवाचा पाऊस पडणार आहे
त्या पहिल्या म्रुदगंधामधे मोर नाचणार आहे… मंत्रमुग्ध होऊन…
No comments:
Post a Comment