Sometimes I dream to be tennis player and holding any Australian Open, US open, Wimbledon trophy in my hand... sometime I am an Actor making awesome movie which is bringing "change" in the society which is making people "think" and "act" for the betterment of the society...
Sometimes I am poet who has written a beautiful poems/verses which has melted the heart of killer, which had explained the real meaning of "Love"...
Sometimes I am an Investor who is making money like machine, who is predicting every bearish and bullish movement in the market...
but most of the times I am "Me" searching for the "reason behind existence", finding "goal of life", struggling with own "egos".... just the tiny creature who is merely alive, dragging our own self day by day... "think"(?)ing all the times... only "react"ing to the situations and answering own disbelieves for saving self pride in his/her own eyes...
Again sometimes when I realise this I cry... I run... I scream...
In the end..... I go into the Loop of hibernation
Thursday, 24 January 2008
Thursday, 30 August 2007
अंधार..... कि प्रकाश
संध्याकाळ्ची वेळ, कामावरुन घरी चाललो होतो. संध्याकाळ असुनही सुर्याचा प्रकाश अगदी प्रखर आणि स्वच्छ होता. चालता चालता सतत सुर्याकडे बघत होतो. एकदम प्रकाश प्रखर झाला आणि डोळ्यासमोर लख्ख प्रकाश होता... पुढुन चालत येणारया व्यक्तिंच्या फ़क्त आक्रुत्या दिसत होत्या... उंच, ठेंगण्या, जाड, बारीक....
मनात आले कि डोळ्यासमोर अंधेरी आली का? किंबहुना खरा प्रकाशचं होता तो. ज्यामधे हे वास्तव कळत होते कि समोर दिसणारे सारे काही नुसतेच चेहरे आहेत, सगळे सारखे. ज्यामागे आपण इतके धावतोय तो अंधार, डोळ्यापुढे जे आत्ता दिसते आहे ते वास्तव...

Tuesday, 19 June 2007
मुक्तछंद
पुन्हा एक पान, पुन्हा काहि शब्द, एकत्र येउन बनलेली वाक्य... निरर्थक वाक्य, चंचल वाक्य, सुसुत्र वाक्य, अर्थ मात्र एकच - कल्लोळ. ना व्रुत्त, ना अलंकार, ना लय, ना ताल.... मुक्तछंद. ना दिशा, ना ध्येय, ना उत्साह, ना सुत्र... मुक्तछंद. ना प्रेम, ना द्वेष, ना स्पर्धा, ना आकांक्षा.... मुक्तछंद.
कुठवर, कशासाठी, कुणासाठी, कां? कुठे विसावा नाहीचं का? कुठे वळण नाहीच का? कुठे दिशा नाहीच का?
वेड म्हणजे काय? एक विसावा... सतत असंबद्धपणे फ़िरणारया पात्रांचा एक सुसुत्र खेळ. एक म्रुगजळ, जे नाही त्यासाठीचा कधीही न संपणारा पाठलाग. एक वावटळ, दहाही दिशांनी येणारया जाणारया प्रकाशासोबत स्पर्धा करतांना होणारी तडफड. एक शुन्य, ज्याला सुरवात नाही, शेवट नाही, ज्याची खोली नाही, जाडी नाही... वेड.. एक भावनासंचय...

Tuesday, 1 May 2007
Abrupt thoughts...
Life is so beautifully complicated that sometime you love it as “silk worm’s creativity” and sometime you just get lost in understanding its complexity…. (marathi madhe- tya guntyat guntun jata)
When you plan something, be assured that there will be change...
We always know the answers to our questions but we are so used to finding the solution from others we just stop thinking. Answer of your every question lies in the question itself!!!

Tuesday, 9 January 2007
भास्कर!
तू रोज आपल्या सहस्त्ररश्मींनी
या विश्वातला अंधार दुर करतो
नव्या अपेक्षांची, आकांक्षांची
पुलकीत पहाट आपल्या कुशीत आणतो
कुठल्याही स्वार्थाशिवाय, अभिनिवेषाशिवाय...
तोच भास्कर संध्याकाळी थकून भागून
सागराच्या उदरात विसाव्यासाठी जातो
पण खरचं तो विसावा घेतो?
नाही खचितचं नाही
तो सारी शक्ती पुन्हा एकवटत असतो
नव्या पहाटेला, आकांक्षांना बळ देण्याकरता
कुठल्याही 'अहंगंडा'शिवाय
दुसरयांकरता आनंदाने, निरपेक्षपणे तो जगतो...
आणि तेवढ्याच तत्परतेने, मेघ दाटले कि
इतरांच्या चुकांची झालरही तो आपल्या अंगावर घेतो
ग्रहणाच्या वेळीही याचा स्वभावधर्म बदलत नाही
पूर्ण झाकोळून जायच्या आधी हिरयासारखा चमकल्याशिवाय राहत नाही..
कारण तो ही जाणत असतो, हे ग्रहण क्षणिक आहे
पून्हा त्याला आसमंत दिपवून टाकायचाय
क्षणापूर्वी पसरलेल्या भयंकर काळोखाचा लवलेषही न बाळगता.....

पायथ्याशी शिखर
शिखरावर गेल्यावर कळतं
पायथ्याशी काय सुख असतं
आकाश जरी जवळ भासलं
तरी क्षितिज मात्र दुर असतं
सुर्यही जातो संध्याकाळी
क्षितिजाच्या उदरात विसाव्यासाठी
आपण तरी साधी माणस आहोत
जगतोच मुळी निवारयाच्या शोधासाठी
शिखरावर पोचलं कि पून्हा
परतायचं पायथ्यापाशीच असतं
पायथ्याशी असतांना, कमीत कमी
मनात 'शिखराच' स्वप्न तरी वसतं
प्रश्न असतो तो फक्त
शिखर आणि पायथ्यातल्या अंतरातला
कुणासाठी आनंद वर जाणारया चढावातला
तर कुणासाठी धक्का क्षणार्धात खाली पोचवणारया उतारातला......

Saturday, 6 January 2007
व्याख्या संगणक अभियंत्याची....
हम्मम्मम्म.... आता हा प्राणि कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे की जी व्यक्ति सतत आपण कुणीतरी वेगळे आहोत असे भासवत असते तरिही गल्लोगल्ली गठ्ठ्याने हे आढळतात, ज्यांच्याकडे पैश्याची कमतरता नसते परंतु तो पैसा, वापरायला मात्र वेळ नसतो, जे चारचौघात मिसळण्यापेक्षा ओर्कुट, माय स्पेस इत्यादि ठिकणी आपला वेळ सत्कारणी (?) लावतात, ज्यातल्या अनेक जणांचा एकदा तरी प्रेमभंग किंव्हा ब्रेकअप (:D :P) झालेला असतो...... आणि असंख्य उदाहरणे... हो एक राहिले.. जे हे असे ब्लाग लिहत असतात..... (:P :P :P)
हलकेच घ्या,
आपलाच एक संगणक अभियंता (?) मित्र :-)
हलकेच घ्या,
आपलाच एक संगणक अभियंता (?) मित्र :-)
Subscribe to:
Posts (Atom)